Saturday, April 3, 2010

|| मी शोधतोय... जगण्याचं सातत्य ||

खूपदा आणि अनेकदा
अलिकडं सततच
तुझ्यासह आणि तुझ्याशिवाय

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || 


गुढार्थांच्या प्रवासात
अनर्थ लाभताना
तुझा हात आणि साथ
दोन्ही सुटताना

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || क्षणांचे साक्षिदार
फितूर होताना आणि
आपलेच दात सुळ्यासारखे
रुतताना गळाभर
आठवतो तुझा रुद्र स्वर
हवेत अलगद विरताना

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || कित्येकदा जाणिव बधीर
होताना अन् बंधमुक्त
होऊनही पक्षी पिंजऱयात
परतताना कारणमीमांसा
वर्ज्य असते...तरीही

|| मी शोधतोय...
जगण्याचं सातत्य || 

1 comment: